लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा!-Big Relief for Beneficiaries!

Big Relief for Beneficiaries!

लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून एकदम भारी बातमी आलीये हं! ई-केवायसीची जी अट होती ना – ती आता थोडी शिथिल केली गेलीय. आधी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकणं अगदी कंपल्सरी होतं.

Big Relief for Beneficiaries!पण ज्या बहिणींचे पती किंवा वडील आता नाहीयेत, त्यांना मोठी अडचण होत होती. त्या बहिणींसाठी सरकारनं दिलासा दिलाय. आता त्या आपल्या इतर नातेवाईकांचं आधार कार्ड जोडू शकतात.

ई-केवायसी करणं अजूनही गरजेचं आहे, पण आता त्या नियमात थोडं लवचिकपण आलंय. म्हणजेच, लाभार्थींना आपला आधार क्रमांक, फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, बँक डिटेल्स वगैरे अपलोड करावं लागणार आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच पुढचे हप्ते मिळणार आहेत.

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयानं यासंदर्भात अपडेट दिलंय. त्यामुळे राज्यभरातील हजारो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू आलंय. शासनानं शेवटी त्यांच्या विनंत्या ऐकल्या, आणि हा छोटा पण महत्त्वाचा बदल केला

Comments are closed.