स्पर्धा परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा! – Big Relief for Aspirants: One!

Big Relief for Aspirants: One!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली असून, त्यामुळे राज्यभरातील हजारो परीक्षार्थ्यांना पुन्हा संधी मिळाली आहे.

Big Relief for Aspirants: One!या निर्णयामुळे पूर्वी वयोमर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरलेले उमेदवार आता ६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत. ही सवलत एकदाच, विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली असून, परीक्षार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील गट-ब व गट-क परीक्षेची तयारी करणाऱ्या ६० हून अधिक उमेदवारांना ही शेवटची संधी ठरणार आहे. यामुळे जिल्ह्यातून भविष्यात काही उमेदवार शासकीय सेवेत अधिकारी म्हणून दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या निवडक केंद्रांवरच परीक्षा देण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.