युनियन बँकेत २१ लाखांचं वार्षिक पॅकेज, आणि तीही २५० ‘वेल्थ मॅनेजर’ पदासाठी नोकरी!-Big Offer in Union Bank!

Big Offer in Union Bank!

युनियन बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपल्या लोकांची बँक, त्यांनी मुंबईतून एक भलीमोठी भरती जाहीर केली हाय! २१ लाखांचं वार्षिक पॅकेज, आणि तीही २५० ‘वेल्थ मॅनेजर’ पदासाठी!

Big Offer in Union Bank!अर्ज करायची शेवटची तारीख २५ ऑगस्ट, आणि अर्ज सुरू झाल्यात ५ ऑगस्टपासून. ऑनलाईनच अर्ज करायचाय, बँकेच्या वेबसाइटवर जावून.

काय लागणार हाय पात्रता?
MBA/MMS/PGDM वगैरे दोन वर्षांचं फुलटाईम कोर्स झालेला असावा. आणि तिथेच नाही थांबत – किमान ३ वर्षांचा अनुभव हवाय बँकिंग किंवा अ‍ॅसेट मॅनेजमेंटमध्ये.

निवड कशी होणार?
ऑनलाईन परीक्षा, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि वैद्यकीय तपासणीसह सगळी टप्प्याटप्प्यांची प्रक्रिया आहे.

पगार किती?
पगार म्हणजे भन्नाट! फक्त बेसिक नव्हे तर महागाई भत्ता, स्पेशल भत्ता, घरभाडं भत्ता, गाडीचा भत्ता, मोबाईल खर्च परत, मेडिकल क्लेम – मोट्ठं CTC जवळपास २१ लाखांचं!

कोण अर्ज करू शकतं?
वय २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यानचं असावं. आरक्षणधारकांसाठी सूट आहे. आणि ही भरती महाराष्ट्रातल्याच शाखांसाठी आहे, म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणं अशा भागातल्या लोकांसाठी सुवर्णसंधी!

लवकर अर्ज करा!
👉 www.unionbankofindia.co.in

Comments are closed.