म्हैसूर येथील CSIR अंतर्गत येणाऱ्या Central Food Technological Research Institute (CFTRI) या नामांकित शास्त्रीय संशोधन संस्थेमध्ये टेक्निकल असिस्टंट पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण १८ पदं रिक्त आहेत आणि या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता व आवश्यक अनुभव:
या पदांसाठी संबंधित शाखेतील ६०% गुणांसह डिप्लोमा किंवा बी.एससी. पदवी अनिवार्य आहे. त्यासोबतच किमान १ ते २ वर्षांचा अनुभव संबंधित क्षेत्रात असणं आवश्यक आहे. उदा. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, फूड टेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री अशा विविध शाखांमध्ये ही भरती आहे.
पगार आणि वेतनश्रेणी:
या पदासाठी ६ व्या वेतनश्रेणीनुसार (Level-6) मासिक पगार मिळणार आहे जो सुमारे ₹64,740/- पर्यंत जाईल. त्यामुळे ही एक चांगली आणि स्थिर शासकीय नोकरीची संधी आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?:
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल. आधी ट्रेड टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपात) घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होईल ज्यात ३ पेपर्स असतील –
- पेपर १: मेंटल अॅबिलिटी टेस्ट (१०० प्रश्न, फक्त पात्रता)
- पेपर २: जनरल अवेअरनेस आणि इंग्रजी (२५+२५ प्रश्न, निगेटिव्ह मार्किंगसह)
- पेपर ३: संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्न (३०० गुण)
- पेपर २ आणि पेपर ३ मधील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.
वयोमर्यादा आणि सवलती:
सामान्य उमेदवारांसाठी वयोमर्यादा २८ ते ३० वर्षे आहे. मात्र अनुसूचित जाती-जमाती, इमाव, महिला, विधवा व दिव्यांग उमेदवारांना शासनानुसार ३ ते १५ वर्षांपर्यंत वयातील सवलत मिळेल.
कामाचं ठिकाण कुठं असेल?:
निवड झाल्यानंतर उमेदवाराला CFTRI, म्हैसूर येथील मुख्यालय किंवा संस्थेची मुंबई, लखनौ, हैद्राबाद येथील रिसोर्स सेंटर्समध्ये नियुक्त केलं जाईल. यामुळे देशपातळीवर काम करण्याची संधीही मिळणार आहे.
अर्ज शुल्क आणि अंतिम तारीख:
सामान्य आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज फी ₹500/- आहे. मात्र महिला, अजा, अज, दिव्यांग आणि माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १० मे २०२५ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे.
ऑनलाइन अर्ज कुठं करायचा?:
उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा –
https://cftri.res.in
https://recruitment.cftri.res.in