बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) अंतर्गत 2026 साठी विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सीनियर सायंटिस्ट कम हेड, फार्म मॅनेजर, स्टेनोग्राफर ग्रेड-III तसेच ड्रायव्हर अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2026 आहे.
या भरतीद्वारे एकूण 59 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण, तर काहींसाठी पदवी किंवा MSc पदवी आवश्यक आहे. उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे असून, कमाल वयोमर्यादा पदानुसार 30, 33, 35 किंवा 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
सामान्य, OBC व EWS उमेदवारांसाठी वैज्ञानिक, तांत्रिक व KVS पदांसाठी ₹1,000 तर नॉन-टेक्निकल पदांसाठी ₹500 शुल्क आकारले जाणार आहे. SC, ST, दिव्यांग व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- प्रथम BHU च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुखपृष्ठावरील Apply Online या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्ज शुल्क भरून अर्ज पूर्ण करा.
- शेवटी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
सरकारी विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी BHU भरती 2026 ही एक उत्तम संधी असून, वेळेत अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Comments are closed.