भाईंदर फायरमनची न्यायालयीन लढाई!-Bhayanadar Firemen in Court!

Bhayanadar Firemen in Court!

भाईंदर महापालिकेच्या मेगा भरतीवर आता वादंग निर्माण झालंय. अग्निशमन विभागात सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणारे तब्बल ७५ फायरमन भरती प्रक्रियेतून वगळले जाणार आहेत. कारण? वयोमर्यादा ओलांडली म्हणून!

Bhayanadar Firemen in Court!यावर संतप्त फायरमननी थेट कामगार न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. १० सप्टेंबर रोजी त्यांनी याचिका दाखल केली असून, १२ सप्टेंबरला सुनावणी ठरली होती. पण पालिकेचे वकील गैरहजर राहिल्याने प्रकरणाची पुढची तारीख १८ सप्टेंबर दिली गेलीय.

मेगा भरतीत एकूण ३५८ पदं जाहीर झाली आहेत. यापैकी तब्बल २४१ पदं फायरमनची आहेत. सर्व पदांसाठी टीसीएसकडून परीक्षा होणार आहे. मात्र सात वर्षांपासून जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी फायरमनना थेट सेवेत घेण्याची मागणी पालिकेकडे झाली होती, पण ती नाकारण्यात आली. त्यामुळे आता हे जवान न्यायालयीन लढाईला सज्ज झालेत.

Comments are closed.