बुलडाण्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा गैरवापर!-Beloved Sister” Scam Exposed!

Beloved Sister” Scam Exposed!

बुलडाण्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा गैरवापर झाल्याचं समोर आलंय. जानेफळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या एका पुरुष परिचरानेच ‘लाडकी बहीण’चा लाभ घेतलाय! हे समजल्यावर प्रशासन हादरून गेलं.

Beloved Sister” Scam Exposed!राज्यात अनेक भागात ही योजना खरं तर महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. पण आता शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच लाभ उचलल्याचं समोर येतंय. बुलडाणा जिल्हा परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १९९ बोगस लाभार्थी आढळलेत.

या प्रकरणावरून राज्य शासनानं सखोल चौकशीचे आदेश दिलेत. जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात यांनी विभागप्रमुखांना पत्राद्वारे पडताळणीचे आदेश दिले. महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येंडोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सध्या सुरू आहे.

चौकशीत अनेक बाबी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे, ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी असताना पुरुष कर्मचाऱ्यांनीच फायदा घेतल्याने व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Comments are closed.