लाडकी सून, हक्काचा सन्मान!-Beloved Bride, Deserved Dignity!

Beloved Bride, Deserved Dignity!

राज्यभर घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाल्याचं लक्षात घेता, महिलांना न्याय मिळावा या हेतूनं शिवसेनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. ‘लाडकी बहीण योजने’नंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय.

Beloved Bride, Deserved Dignity!ही योजना त्या सुनांसाठी आहे ज्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक त्रासाला सामोऱ्या जातात. त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी एक हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू करण्यात आलाय – 8828862288. या मोहिमेमध्ये शिवसेनेच्या शाखा आणि कार्यालयं सक्रिय भूमिका घेणार आहेत.

योजनेचा मुख्य उद्देश सासू-सुनांमध्ये सुसंवाद वाढवणं, समुपदेशनाद्वारे कुटुंबात सामंजस्य निर्माण करणं आणि गरज असल्यास तात्काळ मदत उपलब्ध करून देणं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “घरात जशी आपली मुलगी लाडकी असते, तशीच सूनही लाडकी व्हायला हवी. अनेक घरांमध्ये सुनांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. पीडित महिलांनी न घाबरता पुढं यावं आणि हेल्पलाईनवर संपर्क साधावा.”

या योजनेअंतर्गत चांगल्या सासूंचाही गौरव करण्यात येणार आहे, जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाईल. समुपदेशनाद्वारे सुरुवात केली जाईल, पण काही ठिकाणी गरज असल्यास ‘शिवसेना स्टाईल’ हस्तक्षेप केला जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.

राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखेतून मदत उपलब्ध होणार आहे.

Comments are closed.