सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) तर्फे प्रोबेशनरी इंजिनिअर या पदासाठी तब्बल ३४० रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया bel-india.in या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे.

- या भरतीसाठी उमेदवारांकडे खालील पात्रता आवश्यक आहे –
- उमेदवारांकडे B.E. किंवा B.Tech. पदवी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, मॅकेनिकल, कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रिकल किवा संबंधित शाखेत असावी.
- किवा B.Sc. (इंजिनिअरिंग) / AMIE / AMIETE / GIETE मधील फर्स्ट क्लास पदवीधारक उमेदवारही पात्र ठरतील.
- एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांना फक्त उत्तीर्ण पदवी असली तरी चालेल.
वयोमर्यादा तपशीलः
- सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वय २५ वर्षे (१ ऑक्टोबर २०२५ रोजी आधार मानला जाईल).
- एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादत सूट दिली जाईल.
उमेदवारांची निवड कंप्यूटर आधारित परीक्षेद्वारे (CBI) केली जाणार आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे-
- जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी: ₹1180
- एससी, एसटी व अपंग उमेदवारः शुल्कातून सूट
ही भरती भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीत स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुण अभियंत्यांसाठी एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

Comments are closed.