जर्मनीकडे बार्टीची पहिली तुकडी-BARTI’s First Batch to Germany

BARTI's First Batch to Germany

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)’ आणि ‘निटकॉन, दिल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जातीतील एक हजार विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगाराच्या संधीसाठी निवडण्यात आलं आहे.

BARTI's First Batch to Germanyतीन महिन्यांचं जर्मन भाषा प्रशिक्षण सध्या देशभरातील विविध केंद्रांवर सुरू असून, प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा ₹४,००० विद्यावेतन दिलं जातंय. हे प्रशिक्षण ‘ग्योथे इन्स्टिट्यूट’ मार्फत घेतलं जात असून, प्रमाणपत्राची मान्यता थेट जर्मनीत आहे.

परीक्षा, पासपोर्ट, व्हिसा – सर्व तयारी पूर्ण!
उमेदवारांना जर्मन परीक्षेसाठी मार्गदर्शन व मदत मिळणार आहे. शिवाय पासपोर्ट, व्हिसा व इतर कागदपत्रांची पूर्तता देखील बार्टीमार्फत केली जाणार आहे.

प्रमुख प्रशिक्षण केंद्रं:
पुणे (१८०), छ. संभाजीनगर (१६०), दापोडी (१२०), नाशिक (१००), नागपूर (२१०), ठाणे (१००), नवी मुंबई (५०), हिंगोली (३०)

बार्टीचे महासंचालक सुनील वारे म्हणाले, “सध्या एक हजार विद्यार्थी जर्मन शिकत आहेत. साडेतीन महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली तुकडी पुढच्या महिन्यात जर्मनीकडे रवाना होणार आहे.”

Comments are closed.