डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी समुपदेशन पोर्टल सुरू करण्यात आले असून, पसंतीच्या प्रशिक्षण केंद्राची निवड करण्याची आज (दि. ३१) अखेरची संधी आहे.

राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या सात केंद्रांवर प्रत्येकी जेईईसाठी ७५ व नीटसाठी ७५ उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग-इन करून आपल्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडावे.
‘बार्टी’ने स्पष्ट केले आहे की एकदा दिलेला पसंतीक्रम अंतिम असेल आणि त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी योग्य माहिती घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.