BARC मध्ये JRF फेलोशिपची संधी!-BARC JRF Recruitment 2026!

BARC JRF Recruitment 2026!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर (BARC) ने ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) 2026 अंतर्गत भरती जाहीर केली असून एकूण १०५ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

BARC JRF Recruitment 2026!या भरतीसाठी १० मार्च २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३७,००० रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे. कामगिरी समाधानकारक असल्यास पुढे सिनिअर रिसर्च फेलोशिप (SRF) देण्यात येऊन ४२,००० रुपये स्टायपेंड मिळू शकते.

या फेलोशिपसाठी एमएससी, इंटीग्रेटेड एमएससी, बीएस-एमएस किंवा बीएस पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच UGC-CSIR-NET, JEST, ICMR-JRF किंवा ICAR-JRF यापैकी कोणत्याही परीक्षेचा वैध स्कोअर असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखती जून-जुलै २०२६ दरम्यान होण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी barcocesexam.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करिअर विभागात Junior Research Fellowship पर्याय निवडावा. त्यानंतर नोंदणी करून अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे, फोटो व सही अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्जाची प्रत भविष्यासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

Comments are closed.