सरकारी नोकरीची मोठी संधी! बँक ऑफ इंडियात 514 क्रेडिट ऑफिसर पदांची भरती; 20 डिसेंबरपासून अर्ज सुरू, पगार ₹1.20 लाखांपर्यंत! | Bank of India Recruitment for 514 Posts!

Bank of India Recruitment for 514 Posts!

Government Jobs शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (Bank of India) यांनी 514 क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार bankofindia.bank.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV स्तरावरील पदांचा समावेश आहे.

 

Bank of India Recruitment for 514 Posts!

या भरतीमध्ये MMGS-II स्तरासाठी 418 पदे, MMGS-III स्तरासाठी 60 पदे आणि SMGS-IV स्तरासाठी 36 पदे असून, एकूण 514 पदे भरण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/PWD) उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.

वयोमर्यादेबाबत, MMGS-II पदासाठी 25 ते 35 वर्षे, MMGS-III साठी 28 ते 38 वर्षे आणि SMGS-IV साठी 30 ते 40 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्ज शुल्क SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹175, तर सामान्य व इतर प्रवर्गांसाठी ₹850 इतके आहे.

पगाराच्या बाबतीत ही भरती अत्यंत आकर्षक असून, MMGS-II पदासाठी ₹64,820 ते ₹93,960, MMGS-III साठी ₹85,920 ते ₹1,05,280 आणि SMGS-IV पदासाठी ₹1,02,300 ते ₹1,20,940 प्रतिमाह इतका पगार मिळणार आहे. त्यामुळे ही भरती उच्च पगाराच्या बँक नोकऱ्यांमध्ये मोडते.

निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीच्या आधारे राबवली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असून, परीक्षेत इंग्रजी भाषा, रीझनिंग, परिमाणात्मक अभियोग्यता आणि व्यावसायिक ज्ञान या विषयांचा समावेश असेल. एकूण 150 प्रश्नांसाठी 150 गुण असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांची नकारात्मक गुणांकन पद्धत लागू असेल. कटऑफ General/EWS साठी 35% तर SC/ST/OBC/PWBD साठी 30% निश्चित करण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम Bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन Careers विभागात जावे, ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी, अर्ज भरणे, शुल्क भरणे आणि अंतिम सबमिशननंतर अर्जाची प्रत जतन करून ठेवावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज लिंक अवश्य तपासावी.

Comments are closed.