बँक ऑफ बडोदा (BOB) कडून 2025 साली विविध मॅनेजर पदांसाठी 50 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर (क्रेडिट अॅनालिस्ट), आणि चीफ मॅनेजर C & IC-रिलेशनशिप मॅनेजर पदांचा समावेश आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झाली असून, इच्छुक उमेदवार 30 ऑक्टोबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात: www.bankofbaroda.in.
पात्रता:
उमेदवारांनी CA, CMA, CS, CFA, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.
अर्ज फी:
- सामान्य, EWS, OBC: ₹850
- SC, ST, PWD, महिला: ₹175
निवड प्रक्रियेतील टप्पे:
- अर्जाची शॉर्टलिस्टिंग (Qualification & Experience आधारित)
- ग्रुप डिस्कशन
- वैयक्तिक मुलाखत
ऑनलाइन परीक्षा पॅटर्न:
- चार विभाग: Reasoning, English, Quantitative Aptitude, Professional Knowledge
- एकूण 150 प्रश्न, 225 मार्क्स, 150 मिनिटे
- Professional Knowledge मध्ये 75 प्रश्न, 150 मार्क्स
- इतर तीन विभागांमध्ये प्रत्येकी 25 प्रश्न, 25 मार्क्स
कसे अर्ज कराल:
- www.bankofbaroda.in वर जा
- “Career” टॅब → “Current Opportunities” निवडा
- “Apply Now” क्लिक करा, हवेले पद निवडा
- अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरा आणि सबमिट करा
- प्रिंट घेत ठेवा
या भरतीसाठी अनुभव व पात्रतेनुसार निवड केली जाईल, आणि अंतिम निर्णय व्यक्तिगत मुलाखतीनंतर घेतला जाईल.

Comments are closed.