लाखोंच्या पगाराची बँक नोकरी!-Bank Job with Salary in Lakhs!

Bank Job with Salary in Lakhs!

सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी जबरदस्त बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी तब्बल 127 जागांची भरती जाहीर झाली आहे.

Bank Job with Salary in Lakhs!

अर्ज प्रक्रिया 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, 3 ऑक्टोबर 2025 हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर  iob.in स्वीकारले जाणार आहेत.

पात्रता कोणासाठी?

ही भरती पदवीधर आणि पदव्युत्तरांसाठी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही B.Arch, B.Tech / BE, M.Sc, ME / M.Tech, MBA / PGDM, MCA किंवा PGDBA अशा डिग्री घेतल्या असतील तर तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे. मात्र, अर्ज करण्याआधी बँकेने काढलेली अधिसूचना नीट वाचणे गरजेचे आहे.

अर्ज फी किती?

या भरती प्रक्रियेत अर्ज फी श्रेणीनुसार ठेवली आहे.

  • General / OBC / EWS उमेदवारांसाठी: ₹1000 (GST सह)

  • SC / ST / PWD उमेदवारांसाठी: ₹175 (GST सह)

पेमेंटसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI यांचा वापर करता येतो.

पगार किती मिळणार?

  • MMGS-II ग्रेड: सुरुवातीचा पगार ₹64,820 असून अनुभव व बढतीनुसार तो ₹93,960 पर्यंत पोहोचतो.

  • MMGS-III ग्रेड: सुरुवात ₹85,920 असून कमाल पगार ₹1,05,280 पर्यंत जाऊ शकतो.

याशिवाय, बँकेच्या नियमानुसार विविध भत्ते व सुविधा मिळणार आहेत.

निवड प्रक्रिया

सर्वप्रथम, पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. केवळ पात्रता पूर्ण करणं म्हणजेच मुलाखतीची हमी नाही.

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम IOB च्या अधिकृत वेबसाइटवर iob.in लॉगिन करा.
तेथे “Specialist Officer Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
भरतीची अधिसूचना नीट वाचा आणि ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट प्रत स्वतःकडे ठेवा.

Comments are closed.