बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरू! – BAMU UG Exams Begin!

BAMU UG Exams Begin!

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष (प्रथम व द्वितीय सत्र) परीक्षा अखेर १५ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. यापूर्वी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा आता निश्चित वेळापत्रकानुसार पार पडणार असून, चार जिल्ह्यांतील सुमारे ८७ हजार विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत.

BAMU UG Exams Begin!राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी-२०२०) अंतर्गत या परीक्षा ‘होम सेंटर, होम अॅसेसमेंट’ पद्धतीने संबंधित महाविद्यालयांमध्ये घेतल्या जात आहेत.

विद्यापीठाने परीक्षांचे संपूर्ण नियोजन पूर्ण केले असून, महाविद्यालयांनीही बैठक व्यवस्था व कार्यपद्धतीची तयारी केली आहे.

१५ ते २९ डिसेंबर या कालावधीत या परीक्षा पार पडणार असून, परीक्षेबाबत आवश्यक सूचना प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करावा लागल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.