बीपीएड सीईटी नोंदणीला मुदतवाढ!-B.P.Ed CET Registration Extended!

B.P.Ed CET Registration Extended!

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET Cell) बीपीएड (Bachelor of Physical Education) अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या प्रवेश नोंदणी प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र यंदाही स्पष्ट झाले आहे.

B.P.Ed CET Registration Extended!१६ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नोंदणी प्रक्रियेत केवळ २,६३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून ही संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी या उद्देशाने सीईटी कक्षाने अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील तीन वर्षांतील आकडेवारी पाहता बीपीएड अभ्यासक्रमासाठी नोंदणी सातत्याने घटत आहे. २०२३-२४ मध्ये सुमारे ९,३९९ तर २०२४-२५ मध्ये ७,३९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०२५-२६ मध्ये ही संख्या आणखी कमी झाली असून विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमाबाबत उदासीनता दिसून येत आहे.

दरम्यान, बीपीएड सीईटी परीक्षा ४ एप्रिल २०२६ रोजी होणार असून फिल्ड टेस्ट ५ ते ७ एप्रिलदरम्यान घेतली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज, माहिती पुस्तिका व वेळापत्रक अधिकृत mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Comments are closed.