बीएड–लॉ सीईटी नोंदणी सुरू!-B.Ed & Law CET Registration Open!

B.Ed & Law CET Registration Open!

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी बी.एड. (जनरल, स्पेशल व इलेक्टिव्ह) तसेच तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला ८ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिली आहे.

B.Ed & Law CET Registration Open!यापूर्वी एमपीएड, एमएड, एमसीए आणि एमएचएमसीटी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता बीएड आणि तीन वर्षीय लॉ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला असून, उर्वरित अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे कक्षाने स्पष्ट केले आहे.

  • परीक्षा वेळापत्रक
  • बीएड सीईटी : २७ ते २९ मार्च
  • तीन वर्षीय एलएलबी सीईटी : १ ते २ एप्रिल

या दोन्ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया, सविस्तर वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दरम्यान, बीएड–एमएड (एकत्रित तीन वर्षीय) आणि पाच वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठीही ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून, ही प्रक्रिया ९ ते २४ जानेवारी या कालावधीत चालणार आहे. बीएड–एमएड सीईटी परीक्षा १ एप्रिल, तर पाच वर्षीय एलएलबी सीईटी परीक्षा ८ मे रोजी होणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.

Comments are closed.