पॅट परीक्षा वेळापत्रक जाहीर!-AT Exam Schedule Out!

AT Exam Schedule Out!

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) ने अखेर यंदाच्या संकलित मूल्यमापन चाचणी-१ म्हणजेच पॅटचे वेळापत्रक काढलंय. १०, ११ आणि १३ ऑक्टोबर रोजी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

AT Exam Schedule Out!या परीक्षा सरकारी, खाजगी आणि अनुदानित शाळांमधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना द्याव्याच लागतील.

गेल्या वर्षी एप्रिलमध्येच परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे SCERT वर शिक्षक संघटनांनी जोरदार टीका केली होती. शाळांचा हक्क हिसकावून घेतल्यामुळे नाराजी वाढली होती. म्हणून यंदा सहामाही परीक्षांचं नियोजन थेट शाळांनाच सोपवण्यात आलं आहे.

परीक्षेची वेळसुद्धा इयत्तेनुसार ठरवली गेली आहे – दुसरीसाठी ६० मिनिटं, तिसरी ते सहावी ९० मिनिटं, तर सातवी-आठवीकरता तब्बल १२० मिनिटं. प्रत्येक पेपरमध्ये लेखी आणि मौखिक दोन्ही भाग असतील. गुणपद्धतीनुसार दुसरीकरता ३०, तिसरी-चौथीकरता ४०, पाचवी-सहावीकरता ५० आणि सातवी-आठवीकरता ६० गुणांचे पेपर होणार आहेत.

थोडक्यात – यंदाची पॅट परीक्षा ऑक्टोबरमध्ये ठरली असून शाळांना सहामाही परीक्षांचं स्वातंत्र्य देण्यात आलंय.

Comments are closed.