महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानं आश्रम शाळांसाठी मोठी भरती जाहीर केलीये. राज्यभर ६६१ कंत्राटी शिक्षकांच्या जागा भरायच्या असून यात कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांचा समावेश आहे.
इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ई-मेलद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
कला शिक्षकांना २०,०००, क्रीडा शिक्षकांना २५,०००, आणि संगणक शिक्षकांना २०,००० रुपये मानधन दिलं जाणार आहे. ही भरती राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शासकीय आश्रम शाळांसाठी करण्यात येतेय.
आवश्यक पात्रता: कला शिक्षक: ATD किंवा MA/BFA (नृत्य/गायन/वादन)
क्रीडा शिक्षक: उत्कृष्ट खेळाडू/माजी सैनिक/निवृत्त पोलीस कर्मचारी/NIS/B.P.Ed/M.P.Ed आणि किमान विद्यापीठ स्तरावर खेळात प्रतिनिधित्व
संगणक शिक्षक: B.Sc.(CS/IT), BCA, BE/B.Tech (Computer), प्राधान्य: MCA/M.Sc.(IT/CS) आणि अनुभव
राज्यातल्या आश्रम शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षक देण्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

Comments are closed.