जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. शालेय शिक्षणाच्या पातळीवर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यामुळे या यशामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेषतः, शाळेच्या एका विद्यार्थ्याने वैयक्तिक विषयात १०० पसेंटाइल मिळवून आपले प्रावीण्य सिद्ध केले आहे. ही एक उल्लेखनीय उपलब्धी असून, विद्यार्थ्याच्या कठोर मेहनतीचे आणि गुणवत्तेचे प्रतिबिंब आहे. याशिवाय, शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी ९९.८० पेक्षा जास्त पसेंटाइल मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. हे निकाल शाळेच्या शैक्षणिक स्तराची उंची दर्शवतात.
याशिवाय, शाळेच्या एकूण १०% विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा अधिक पसेंटाइल मिळवले, जे अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच, ९० पेक्षा जास्त पसेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४० असून, ही बाब शाळेच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाची आणि मार्गदर्शनाच्या प्रभावीतेची साक्ष देते.
या उल्लेखनीय यशाबद्दल अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या प्राचार्या रेणुका जोशी यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन आणि शाळेने दिलेले उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण या सर्व घटकांचा परिणाम म्हणून हा उज्ज्वल निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले प्रगत तंत्रज्ञान व दर्जेदार शिक्षण यामुळेच हे यश शक्य झाले आहे.”
या उज्वल निकालामुळे अशोका स्कूल्सच्या नावात भर टाकली असून, पुढील काळातही विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देऊन त्यांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प शाळेने केला आहे.