आर्टी पूर्व प्रशिक्षण: निवड जाहीर!-ARTI Pre-Training: List Out!

ARTI Pre-Training: List Out!

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

ARTI Pre-Training: List Out!मातंग समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यासाठी आयोजित या परीक्षेचा निकाल आता उपलब्ध झाला असून, गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यूपीएससी, एमपीएससी, गट ‘ब’ व ‘क’, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, बँक, रेल्वे, एलआयसी, कर्मचारी निवड आयोग, पोलीस व सैन्य भरती यांसारख्या विविध परीक्षांसाठी आर्टीमार्फत सीईटी सामाईक चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त गुण आणि आरक्षणानुसार तात्पुरती निवड करण्यात आली आहे.

मूळ कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच अंतिम निवड निश्चित होणार असल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली. निवड झालेल्या उमेदवारांनी https://arti.org.in
या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले नाव तपासावे. तसेच गुणवत्ता यादीच्या आधारे ७ दिवसांच्या आत एक प्रशिक्षण कोर्स निवडणे आवश्यक असून, प्रत्येक विद्यार्थ्याची फक्त एका प्रशिक्षणासाठीच निवड केली जाणार आहे.

Comments are closed.