आर्मी लॉ कॉलेज पेटलं! – Army Law College Unrest!

Army Law College Unrest!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आर्मी लॉ कॉलेजमध्ये मागील ५-६ दिवसांपासून विद्यार्थी ठिय्या आंदोलन करतायत. कॉलेजमध्ये फायनान्स आणि अकाउंटन्सी शिकवायला शिक्षक नाहीत. 

Army Law College Unrest!शैक्षणिक सोयी-सुविधा मोडकळीस आल्या आहेत, आणि स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक रजा नाकारली जाते — या सगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला.

विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, प्राचार्य डॉ. मधुश्री जोशी आणि रजिस्टार कर्नल सुनील मेनन यांचं वागणं उद्धट आणि अपमानजनक आहे. प्राचार्य राजीनामा देईपर्यंत आंदोलन थांबवायचं नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिलाय.

कॉलेज प्रशासनाने मात्र आंदोलनकर्त्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. या सर्व गोंधळात विद्यापीठ प्रशासन मात्र शांत आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “एकही विद्यार्थ्याने आमच्याकडे अजूनतरी लेखी तक्रार दिली नाही.”

आता प्रश्न असा की — विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? आणि कधी?

Comments are closed.