आर्मी अग्निवीर भरती 2026 सुरू! 8वी, 10वी, 12वी पास तरुणांना मोठी संधी! | Army Agniveer Recruitment 2026 Begins Now!

Army Agniveer Recruitment 2026 Begins Now!

भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इंडियन आर्मीने Army CEE 2026 (ऑनलाइन कॉमन एंट्रन्स परीक्षा) साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून 3 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात.

Army Agniveer Recruitment 2026 Begins Now!

या भरतीमध्ये अग्निवीर GD, टेक्निकल, क्लर्क/स्टोअरकीपर, ट्रेड्समन, मिलिटरी पोलिस अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्रतेनुसार 8वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

अग्निवीर GD पदासाठी किमान 45% गुणांसह 10वी पास, टेक्निकल पदासाठी 50% गुणांसह 12वी, तर क्लर्क/स्टोअरकीपर पदासाठी 60% गुणांसह 12वी पात्रता आवश्यक आहे. ट्रेड्समन पदांसाठी 8वी किंवा 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Army CEE 2026 साठी अर्ज करताना सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹250 अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागेल. निवड प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा (CEE), त्यानंतर शारीरिक चाचणी (Physical Test) आणि शेवटी वैद्यकीय तपासणी घेतली जाईल.

सर्व टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे भारतीय सैन्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची आणि मोठी संधी मानली जात आहे.

Comments are closed.