एशिया रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) ही संस्था मानवी आणि सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रात एशियासंदर्भातील उच्च दर्जाचं संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी शिष्यवृत्तीच्या (Fellowships) संधी घेऊन आली आहे.
यामध्ये पोस्टडॉक्टोरल फेलो (Postdoctoral Fellows) आणि रिसर्च फेलो (Research Fellows) ही पदं उपलब्ध आहेत. संशोधनाच्या गुणवत्ता, आधीच्या प्रकाशित लेखनाचा अनुभव आणि ARI च्या संशोधन क्लस्टर्सशी सुसंगत असलेल्या प्रोजेक्ट्सना प्राधान्य दिलं जाईल.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांनी PhD पूर्ण केलेलं असावं. रिसर्च फेलोशिपसाठी पीएचडीनंतर किमान २ वर्षांचा अनुभव आणि दर्जेदार पब्लिकेशन्सचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच, स्पष्ट पब्लिकेशन योजना आणि संबंधित रिसर्च क्लस्टरशी जोडलेलं संशोधन प्रस्तावही आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर, अभ्यासकांनी क्लस्टर लीडरच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागेल, ज्यात वर्कशॉप्स व परिषदा आयोजित करणं, ग्रँटसाठी अर्ज करणं, संशोधन लेखन, प्रकाशन, आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या यांचा समावेश असेल.
मानधनाच्या बाबतीत, पोस्टडॉक्टोरल फेलोजना दरमहिना $6,000 आणि रिसर्च फेलोजना $6,250 पासून मानधन दिलं जाईल. प्रवास भत्ता, रिसर्च व कॉन्फरन्ससाठी आर्थिक सहाय्य, आणि सिंगापूरच्या कायद्यानुसार लागू होणारे इतर फायदेही मिळतील. मात्र, निवास व्यवस्था स्वतः करावी लागेल. या पदांसाठी सुरुवातीचा कालावधी २ वर्षांचा असेल आणि कामगिरी चांगली असल्यास तो वाढवता येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. अर्ज करताना CV (३ पानं), संशोधन प्रस्ताव (२ पानं), प्रकाशित कामाचा नमुना, आणि दोन शिफारसकर्त्यांची माहिती एकत्र PDF स्वरूपात सबमिट करावी लागेल. अर्ज ऑनलाइनच करायचा आहे.
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी खालील लिंक वापरावी:
Postdoctoral Applicants: External Link
Research Fellows Applicants: External Link
सामान्य चौकशीसाठी ar****@*****du.sg या ईमेलवर संपर्क साधावा, आणि क्लस्टरविषयक माहितीसाठी थेट क्लस्टर लीडरला ईमेल करावा. लक्षात ठेवा, केवळ पूर्ण अर्जच विचारात घेतले जातील आणि अंतिम तारखेपासून १० आठवड्यांत उत्तर न मिळाल्यास समजावं की अर्ज निवडलेला नाही.

Comments are closed.