शाळा भेटी सुरू; शिक्षकांना संधी!-Apply Now: Teacher Awards 2025!
Apply Now: Teacher Awards 2025!
राज्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आणि प्रतिष्ठेचा क्षण घेऊन आलेला ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ अर्जासाठी खुला झालाय. पात्र आणि इच्छुक शिक्षकांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम संधी आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पुरस्कार अर्ज प्रक्रियेची सुधारित नियमावली शिक्षण विभागानं जाहीर केली असून, अर्ज मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पारदर्शक पद्धतीनं राबवली जाणार आहे.
१ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट दरम्यान अर्जांची संचालक स्तरावर तपासणी, त्यानंतर ४ ते ८ ऑगस्टमध्ये जिल्हास्तरावर शाळा भेटी, ११ ते १४ ऑगस्टमध्ये मुलाखती व पडताळणी, आणि १८ ते २१ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर २५ ऑगस्टला अंतिम निवड समितीची बैठक होईल आणि २८ ऑगस्टला शासनाकडे निवड यादी पाठवली जाईल. अखेर १ सप्टेंबर रोजी पात्र शिक्षकांची यादी जाहीर होईल, आणि ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
हे पारितोषिक शिक्षकांच्या गुणवत्तेवर आधारित असून, प्रत्येक पातळीवर निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठ निकष आणि थेट शाळा भेटी या तत्वांवर भर देण्यात आलेला आहे.

Comments are closed.