ॲपलनं अखेर आपल्या सेल्स टीममध्ये कर्मचारी कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. कंपनीचं म्हणणं आहे की, ग्राहकांशी नातं आणखी घट्ट करण्यासाठी आणि कामातील पुनरावृत्ती कमी करण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत.
या कपातीचा फटका मुख्यत: मोठ्या उद्योग, शाळा आणि सरकारी खात्यांसोबत काम करणाऱ्या अकाउंट मॅनेजर्सना बसणार आहे.
गेल्या काही वर्षांत टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपाती चालू असताना ॲपल तुलनेने स्थिर राहिलं होतं. मात्र, आता सेल्स स्ट्रक्चर सोपं करणं, खर्च नियंत्रण, रिसेलर चॅनेलवर जास्त भर देणं आणि टीमची पुनर्रचना ही प्रमुख कारणं देत कंपनीनं घोषणा केली आहे.
प्रभावित कर्मचाऱ्यांना २० जानेवारीपर्यंत कंपनीतच नवी भूमिका शोधण्याची संधी दिली आहे; अन्यथा त्यांना सेवरन्स पॅकेज दिलं जाईल. महसूल वाढ सकारात्मक असतानाही ॲपलकडून आलेला हा निर्णय उद्योगात चर्चेचा विषय ठरलाय.

Comments are closed.