शाळांमध्ये साजरा होणार ‘आपलं विद्यालय – आपला स्वाभिमान’ दिन! | ‘Apna Vidyalaya Day’ in Schools!

‘Apna Vidyalaya Day’ in Schools!

महाराष्ट्रातील शैक्षणिक परंपरा आणि मुल्यांचा गौरव करण्यासाठी येत्या १ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘आपलं विद्यालय – आपला स्वाभिमान’ हा विशेष दिन साजरा करण्यात येणार आहे. ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या असून, हा सोहळा सर्व शाळांनी उत्साहात पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘Apna Vidyalaya Day’ in Schools!

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि अभिमानाची जाणीव
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, शिस्त, परंपरा यांसारख्या मुल्यांचा ठसा उमटवला जाणार आहे. शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभरणी करणारी संस्था आहे. त्यामुळे शाळेबद्दल आत्मीयता आणि अभिमानाची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा
शाळांमधील शिक्षकांनी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या विचारांचा संस्कार विद्यार्थ्यांवर केला आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी ‘आपलं विद्यालय आपला स्वाभिमान’ हा दिन महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

विविध उपक्रमांचे आयोजन
या दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये प्रश्नोत्तर स्पर्धा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक सन्मान, समाजोपयोगी उपक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शाळेबद्दलचा अभिमान अधिक दृढ होईल.

पालक आणि समाजाचा सहभाग
या उपक्रमामध्ये शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. समाजाचा सहभाग वाढल्यास शाळेतील कार्यक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

शैक्षणिक परंपरेला नवी दिशा
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक व उच्च शिक्षण विभाग यांच्या पुढाकारातून या उपक्रमाला राज्यभरात पाठबळ मिळाले आहे. यामुळे शाळांच्या शैक्षणिक परंपरेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

देशभक्ती व सामाजिक जाणीव दृढया उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल. समाजोपयोगी कार्यात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. शिक्षणासोबतच समाजाशी जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवणारा ठरेल.

शुभेच्छा संदेश
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘आपलं विद्यालय – आपला स्वाभिमान’ या संस्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान आणि मूल्यांची जाणीव वाढेल. या उपक्रमाद्वारे शिक्षण, संस्कार आणि समाजाचा सेतू अधिक भक्कम होईल.

Comments are closed.