विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अँटी रॅगिंग आठवडा!-Anti-Ragging Week Begins!

Anti-Ragging Week Begins!

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांनी देशभरातल्या सर्व कॉलेजांना १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान अँटी रॅगिंग आठवडा राबवायला सांगितलं आहे. या काळात कॉलेजांमध्ये निबंध, पोस्टर, वादविवाद, पथनाट्य, कार्यशाळा आणि सोशल मीडिया मोहिमा राबवायच्या आहेत.

Anti-Ragging Week Begins!जरी गेल्या काही वर्षांत रॅगिंगचं प्रमाण कमी झालं असलं, तरी अजूनही काही ठिकाणी रॅगिंगच्या घटना घडतातच. विशेषतः वसतिगृहं आणि व्यावसायिक महाविद्यालयं यामध्ये ही समस्या कायम आहे. यावर कडक कारवाई व्हावी म्हणून UGC ने १२ ऑगस्टला ‘अँटी रॅगिंग डे’ घोषित केला आहे.

विद्यार्थ्यांना रॅगिंगचा त्रास होऊ नये यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन 1800-180-5522 सुरू करण्यात आली आहे. तक्रारी he******@*********ng.in या ई-मेलवरही करता येतील.

महत्त्वाचं म्हणजे, कॉलेजांनी राबवलेल्या उपक्रमांचा अहवाल UGCकडे ऑनलाइन पाठवणं अनिवार्य असणार आहे. UGC च्या वेबसाइटवर उपलब्ध रॅगिंगविरोधी व्हिडिओ आणि शॉर्ट फिल्म्स विद्यार्थ्यांना दाखवणंही बंधनकारक आहे.

Comments are closed.