महाराष्ट्र शासनानं अत्यंत दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतलाय! दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि वराहपालन या व्यवसायांना आता शेती समकक्ष दर्जा देण्यात आलाय.
या निर्णयामुळे लाखो पशुपालकांना आता कर्ज, विमा, सोलर सुविधा आणि कर सवलती यांचा थेट लाभ मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे ग्रामीण भागातील उत्पादनवाढ, खर्चात कपात आणि रोजगारनिर्मिती यांना बळ मिळेल. आत्महत्येच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
ही योजना कुणासाठी लागू होईल?
- १०० दुधाळ जनावरांची देखरेख करणारे
- ५०० शेळ्या-मेंढ्यांचे पालन करणारे
- २०० वराह पालन करणारे
- २५,००० मांसल कुक्कुट पक्षी
- ५०,००० अंडी उत्पादक कुक्कुट
- ४५,००० पक्ष्यांच्या क्षमतेचे हॅचरी युनिट
यातून मिळणारे फायदे:
▪️ शेतीप्रमाणेच कर्जावरील व्याजात सवलत
▪️ सोलर पंप व यंत्रसामग्रीसाठी अनुदान
▪️ ग्रामपंचायत स्तरावर कर सवलत
▪️ विमा संरक्षण व नुकसान भरपाई योजना
▪️ खते व बियाणे थेट शेतावर