खुशखबर !! अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना २,००० रुपयांची भाऊबीज भेट! लवकरच खात्यात जमा होणार – Anganwadi Festive Bonus!

Anganwadi Festive Bonus!

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या निर्णयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे.

Anganwadi Festive Bonus!या निर्णयाअंतर्गत प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांना २,००० रुपयांची भाऊबीज भेट थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेसाठी शासनाने तब्बल ४०.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, “सेविका आणि मदतनीस या समाजातील खरी ‘शक्ती’ आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आणि सणात त्यांचा आनंद दुप्पट व्हावा म्हणून ही भेट दिली जात आहे.”

नवी मुंबई येथील आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या माध्यमातून ही रक्कम सेविकांच्या खात्यात जमा होणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गोड आणि संस्मरणीय होणार यात शंका नाही.

Comments are closed.