महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणांमुळे तरुण-तरुणींना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळणार असून, नोकरीच्या संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी केले आहे.
पात्रता व लाभ
- लक्ष्यित जातींमधील वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या उमेदवारांना लाभ
- सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत
- रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रत्यक्ष उपयोगी प्रशिक्षण
उपलब्ध प्रशिक्षण अभ्यासक्रम
अमृत उद्योग कौशल्यवर्धन, अमृत सूर्य मित्र, सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्यूटी पार्लर), अमृत बेकरी तसेच अमृत आयात–निर्यात प्रशिक्षण असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.
अमृत संस्था ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न मिळालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना विशेषतः राबविण्यात येते. ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, पाटीदार, बंगाली, नायर, नायडू, भूमिहार, कानबी यांसह अनेक जाती या योजनेच्या कक्षेत येतात.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी अमृत कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.