हवाई दलात भरारी घेण्याची तुफान संधी; २ लाखांपेक्षा जास्त पगार मिळणार! | Air Force: A Big Chance to Take Off!

Air Force: A Big Chance to Take Off!

हवाई दलात नोकरीचं स्वप्न पहाणाऱ्यांसाठी एकदम भारी बातमी समोर आलीये! भारतीय हवाई दलानं AFCAT 1 – 2026 ची अधिकृत जाहिरात काढलीये. फ्लाइंग ऑफिसर, टेक्निकल, आणी ग्राउंड ड्युटी या तिन्ही शाखांसाठी ही मोठी परीक्षा घेण्यात येणार. अर्ज करायचा असेल तर सरळ afcat.cdac.in वर जाऊन देता येतो.

Air Force: A Big Chance to Take Off!

कोण अर्ज करू शकतं?
AFCAT 2026 साठी उमेदवाराचं वय २० ते २४ वर्षांत बसलं पाहिजे. फ्लाइंग शाखेसाठी वयोमर्यादेत खास अडथळा नाही. नॉन-टेक्निकलमध्ये कोणतंही पदवीधर चालतं, फक्त पदवीत ५०% गुण असायला हवेत. टेक्निकल शाखेसाठी बी.ई/बी.टेक ६०% गुणांसह आवश्यक.

अर्ज शुल्क:
सगळ्यांसाठी समान फी – ₹५५०. कुणाला सवलत नाही.

निवड प्रक्रिया:
सुरुवातीला ऑनलाइन लेखी परीक्षा घेण्यात येते. ती पार केल्यावर पाच दिवस चालणारी SSB मुलाखत. त्यानंतर कागदपत्रांची नीट तपासणी. शेवटी वैद्यकीय परीक्षा – आणि ही फक्त दोनच ठिकाणी होते:

  • इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन मेडिसिन, बेंगळुरू
  • एअर फोर्स सेंट्रल मेडिकल एस्टॅब्लिशमेंट, नवी दिल्ली

पगार किती मिळतो?
फ्लाइंग ऑफिसरपासून सुरुवात केली तर ₹५६,१०० ते ₹१,७७,५०० महिन्याला.
स्क्वाड्रन लीडर – ₹६९,४०० ते ₹२,०७,२००
विंग कमांडर – ₹१,२१,२०० ते ₹२,१२,४००
ग्रुप कॅप्टन – ₹१,३०,६०० ते ₹२,१५,९००
एअर मार्शल – ₹२,२५,०००
तर CAS (वायुसेना प्रमुख) – तब्बल ₹२,५०,००० प्रतिमहिना!
याशिवाय DA, HRA, फ्लाइंग अलाउन्स, किट मेंटेनन्स, घर, गाडी, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन सगळं मिळतं.

फॉर्म कसा भरायचा?

  • सर्वप्रथम afcat.cdac.in ला भेट द्या
  • होमपेजवर AFCAT 2025 लिंक शोधा आणि क्लिक करा
  • नाव, जन्मतारीख, पात्रता अशी माहिती भरून फॉर्म पूर्ण करा
  • स्कॅन फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट अपलोड करा
  • फी भरून फॉर्म सबमिट करा
  • आणि शेवटी प्रिंट काढून ठेवा

हवाई दलात उड्डाणाची ही सुवर्णसंधी दवडू नका!

Comments are closed.