AIIMS मध्ये 2300+ जागांसाठी भरती!-AIIMS 2025: 2300+ Posts Open!
AIIMS 2025: 2300+ Posts Open!
AIIMS नवी दिल्लीने 2025 साठी ग्रुप A आणि B पदांसाठी तब्बल 2300 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही परीक्षा 25 आणि 26 ऑगस्ट 2025 रोजी घेतली जाणार असून, परीक्षेच्या 3 दिवस आधी हॉलतिकीट व 7 दिवस आधी शहर/राज्याची माहिती देण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात डिप्लोमा, डिग्री किंवा मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षांपर्यंत असून, पदानुसार ती थोडीफार वेगळी असू शकते. निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा, कागदपत्रांची तपासणी आणि अंतिम मेरिट यादीनुसार होणार आहे. परीक्षेत 100 प्रश्नांसाठी 400 गुण असतील, आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Common Recruitment Exam (CRE) 2025’ लिंकवर क्लिक करावे, खाते तयार करून फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फी भरावी व फॉर्म सबमिट करावा.
अर्ज शुल्क सामान्य व OBC उमेदवारांसाठी ₹3000, SC/ST/EWS उमेदवारांसाठी ₹2400 असून दिव्यांग उमेदवारांसाठी फी नाही. एकापेक्षा अधिक ग्रुपसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक ग्रुपसाठी वेगळी फी भरावी लागेल. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका – सरकारी नोकरीसाठी हीच योग्य वेळ आहे!

Comments are closed.