अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), गोवा यांनी त्यांच्या मोप, पेडणे येथील कॅम्पससाठी मेसर्स क्वेस्ट्समार्फत आऊटसोर्स पद्धतीने २६ विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. आयुर्वेद क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील या संस्थेत वैद्यकीय, तांत्रिक तसेच प्रशासकीय पदांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या भरतीमध्ये सहायक ग्रंथालय अधिकारी, विद्युत अभियंता, स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जिकल स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय पदांचा समावेश आहे. तसेच ओटी असिस्टंट, पंचकर्म अटेंडंट व तंत्रज्ञ, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर यांसारखी तांत्रिक पदेही उपलब्ध आहेत.
याशिवाय प्लंबर, पंप तंत्रज्ञ, लिफ्ट ऑपरेटर, गॅस मॅनिफोल्ड तंत्रज्ञ, एसटीपी मदतनीस, माळी, वॉर्ड अटेंडंट, संग्रहालय रक्षक, कामगार (अकुशल), कपडे धुण्याचे काम करणारा व पर्यवेक्षक अशा विविध सहाय्यक व प्रशासकीय पदांचाही समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य सेवा आणि आयुर्वेद क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून इच्छुकांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व पात्रतेनुसार अर्ज सादर करावेत.

Comments are closed.