मायक्रोसॉफ्टच्या अलीकडील अभ्यासानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचा प्रभाव सामान्य नोकऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. अनेकांना वाटतं की एआय ही आयटी, डेटा किंवा लेखन क्षेत्रापुरतीच धोकादायक आहे. पण आता हे चित्र बदलत चाललं आहे. मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, दुभाषी, अनुवादक, विक्री प्रतिनिधी, पत्रकार, इतिहासकार, अगदी प्रवासी परिचारिका यांसारख्या पारंपरिक नोकऱ्यांवरही एआयचा मोठा परिणाम होणार आहे.

AI म्हणजे स्पर्धा नव्हे – सहकारी म्हणून वापरा!
या अभ्यासामध्ये एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे – AI शी स्पर्धा करण्याऐवजी, त्याला सहकारी म्हणून स्वीकारा. एआय ही कोणाचंही स्थान घेण्यासाठी नाही, तर ती काम अधिक प्रभावी, जलद आणि अचूक करण्यासाठी वापरण्याची संधी आहे. मायक्रोसॉफ्टच्या मतानुसार, कामाचे स्वरूपच बदलणार आहे. आपल्याला एआयच्या मदतीने काम करणे शिकावे लागेल – म्हणजे एआयला ‘को-पायलट’ म्हणून स्वीकारून, त्याचा उपयोग आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी करावा.
सर्वाधिक धोक्यात असलेल्या नोकऱ्या कोणत्या?
या अभ्यासात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, काही नोकऱ्यांवर एआयचा परिणाम अधिक प्रमाणात होणार आहे. यामध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधी हे सर्वाधिक धोक्याच्या झोनमध्ये आहेत, कारण हे काम आधीच चॅटबॉट्स आणि एआय सहाय्यकांनी वेगाने घेतले आहे. त्यानंतर लेखक, पत्रकार, संपादक, प्रूफरीडर, अनुवादक, वेब डेव्हलपर्स, डेटा सायंटिस्ट, पीआर प्रोफेशनल्स, बिझनेस अॅनालिस्ट्स यांसारख्या नोकऱ्याही धोक्यात आहेत. कारण या नोकऱ्यांमध्ये भाषेचा वापर, विश्लेषण आणि माहितीवर आधारित निर्णय घेतले जातात – जे एआय सहज करू शकते.
विशेष नोकऱ्यांवर होणारा परिणाम
एआयमुळे परिणाम होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये पुढील नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत:
- दुभाषी आणि अनुवादक
- इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ
- पत्रकार, जनसंपर्क अधिकारी, संपादक
- लेखन व तांत्रिक लेखन करणारे
- क्रेडिट सल्लागार, कर सल्लागार
- कायदेशीर सहाय्यक आणि पॅरालीगल
- मार्केट रिसर्च आणि मॅनेजमेंट विश्लेषक
- HR अधिकारी, विक्री प्रतिनिधी, ग्राहक सेवा कर्मचारी
- विमा, कर्ज आणि वित्तीय क्षेत्रातील अधिकारी
- डेटा सायंटिस्ट, डेटाबेस आर्किटेक्ट
- ट्रॅव्हल एजंट
एआयपासून कमी परिणाम होणाऱ्या नोकऱ्या
सकारात्मक बाब ही की, काही नोकऱ्यांवर एआयचा परिणाम फारसा होणार नाही. यामध्ये ज्या कामांमध्ये शारीरिक श्रम, कौशल्य, किंवा मानवी संपर्काचे महत्त्व आहे अशा नोकऱ्या प्रमुख आहेत. उदाहरणार्थ:
- पंप ऑपरेटर, अग्निशमन अधिकारी
- जलशुद्धीकरण संयंत्र चालक
- बांधकाम कामगार, गवंडी, वेल्डर
- खाण कामगार, सेप्टिक टँक कर्मचारी
- मालिश थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट सहाय्यक
- उत्खनन यंत्र चालक, ड्रिलिंग ऑपरेटर
- डिशवॉशर, क्लीनर, घरकाम करणारे नोकर
एआय मानवी बुद्धिमत्तेची जागा घेणार का?
मायक्रोसॉफ्टचा अभ्यास स्पष्ट करतो की, AI माणसाची जागा घेत नाही, तर कामाची पद्धत बदलत आहे. म्हणजेच, जे काम पूर्वी पूर्णपणे माणसाकडून होत असे, ते आता माणूस + एआय या संगमाने होईल. एआय सर्जनशील विचार, भावनिक समज, गृहितकांवर आधारित निर्णय – या गोष्टी पूर्णपणे करू शकत नाही. म्हणून, जिथे मानवी अनुभव, निर्णयशक्ती, नैतिकता आणि संवाद कौशल्य आवश्यक आहे, तिथे अजूनही मनुष्याचाच वरचष्मा राहणार आहे.
बदल स्वीकारा, नव्या कौशल्यांची तयारी ठेवा!
आपण सर्वांनी या बदलत्या युगाशी जुळवून घेणे अनिवार्य आहे. एआय आता प्रत्येक क्षेत्राचा भाग बनणार आहे. त्यामुळे, नव्या कौशल्यांचे शिक्षण, एआय साधनांचा योग्य वापर, आणि तांत्रिक साक्षरता वाढवणे — हे आपल्या करिअरसाठी गरजेचे ठरणार आहे. घाबरून न जाता, बदल स्वीकारून, AI सोबत काम करण्याची कला शिकली, तर भविष्यात तुमचं स्थान अधिक मजबूत होईल.

Comments are closed.