नागपूरमध्ये आयोजित अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात कृषी क्षेत्रात एआयचा मोठा अध्याय सुरू होत असल्याचे प्रतिपादन प्रतापराव पवार यांनी केले. एनबीएसएस & एलयूपी आणि बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात एआय-आधारित कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या अंतर्गत ऊस, संत्री आणि तूर या पिकांसाठी प्रथम टप्प्यात एआयवर आधारित ‘डोमेन नॉलेज’ विकसित करण्यात येणार आहे.
प्रतापराव पवार म्हणाले की बारामतीत करण्यात आलेले एआयचे यशस्वी प्रयोग आता विदर्भातही राबवले जातील. मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाउंडेशनने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात सहकार्य दिले असून, एआयच्या मदतीने उत्पादन वाढ, खतांचा कमी वापर आणि पाण्याची ४०% बचत साध्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एआय तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता टिकण्यास मदत होते आणि पिकांची कार्यक्षमता वाढते. प्राथमिक स्तरावर हजार शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग केल्यानंतर हे तंत्रज्ञान अधिक मोठ्या प्रमाणात लागू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास एआयची संपूर्ण माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल, असेही प्रतापराव पवार यांनी सांगितले.

Comments are closed.