भारतीय सैन्याने अग्निवीर भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून यंदा २५,००० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी १३ फेब्रुवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ दरम्यान अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लर्क/स्टोअरकीपर टेक्निकल यांसह विविध श्रेणींमध्ये भरती होणार आहे. अर्जदारांचे वय १७.५ ते २१ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया संगणकाधारित परीक्षा (CBT/CEE), भरती रॅली (शारीरिक व वैद्यकीय चाचणी) आणि कागदपत्र पडताळणी अशा तीन टप्प्यांत होईल.
किमान शारीरिक पात्रता निकषांमध्ये १७० से.मी. उंची, ७७ से.मी. छाती (किमान ५ से.मी. विस्तारासह) आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करताना २५० रुपयांचे प्रक्रिया शुल्क एसबीआय पोर्टलद्वारे भरावे लागेल, जे परत न मिळणारे आहे. परीक्षेत सामान्य ज्ञान, विज्ञान, गणित, लॉजिकल रिझनिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स आणि जनरल इंग्रजी या विषयांचा समावेश असेल.
अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांची सेवा संधी मिळेल. पहिल्या वर्षी ३०,००० रुपये मासिक वेतन असून ते चौथ्या वर्षापर्यंत ४०,००० रुपयांपर्यंत वाढेल. सरकारकडून समप्रमाणात योगदानासह अग्निवीर कॉर्पस फंड वजा केल्यानंतर हातात मिळणारे वेतन अंदाजे २१,००० ते २८,००० रुपयांदरम्यान असेल.
अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अभ्यासक्रम आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेतून तपासावी.

Comments are closed.