तमिळनाडूमध्ये महिलांना आगाऊ आर्थिक मदत; सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा जोरदार हल्ला! | Advance Aid to Women in Tamil Nadu!

Advance Aid to Women in Tamil Nadu!

तमिळनाडू सरकारने ‘कलैग्नार महिला हक्क योजना’ अंतर्गत एक कोटी ३१ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केल्याची घोषणा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली. फेब्रुवारीपासूनच्या तीन महिन्यांचे अनुदान तसेच उन्हाळ्यातील अतिरिक्त खर्चासाठी विशेष मदत म्हणून ही आगाऊ रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advance Aid to Women in Tamil Nadu!

महिलांनी ही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी, औषधोपचारांसाठी किंवा अन्य आवश्यक गरजांसाठी वापरावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता आल्यास या योजनेअंतर्गत मासिक अनुदान वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले.

मात्र, सरकारचा हा निर्णय निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या भीतीने घेतलेला राजकीय डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. अण्णा द्रमुक आणि भाजप नेत्यांनी या घोषणेवर टीका करत सरकारवर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

सप्टेंबर २०२३ पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत गरजू महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जातात, आणि सध्या या योजनेचा लाभ एक कोटी ३१ लाख महिला घेत आहेत.

Comments are closed.