प्रवेशात आता मदतीचा हात ; विद्यार्थी सहायता केंद्रं सुरु होणार !

Admission Help Just Nearby!

आता राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी! उच्च शिक्षणात आणि तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्रं सुरु होणार आहेत, असं शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

Admission Help Just Nearby!शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही केंद्रं खूप उपयोगी ठरणार. प्रत्येक जिल्ह्यातल्या कॉलेजांमध्ये ही केंद्रं सुरू होतील.

तिथं अर्ज कसा भरायचा, कागदपत्रं कशी अपलोड करायची, समुपदेशन कसं होईल, अशा सगळ्या गोष्टीत ही केंद्रं विद्यार्थ्यांना थेट मदत करणार.

या केंद्रांना सुसज्ज संगणक, तांत्रिक स्टाफ, आणि सुलभ सेवा मिळणार, ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होईल, असंही पाटील यांनी सांगितलं.

२०२५-२६ पासून ही सेवा सुरू होईल आणि पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सोपी होईल.

Comments are closed.