राज्यभरात सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आलीय. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं (AAI) २०२५ साली 976 कनिष्ठ कार्यकारी पदांकरिता भरती काढलीय. ही संधी मिळवायची असेल, तर २८ ऑगस्टपासून अर्ज सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे.
ही भरती थेट GATE परीक्षेच्या गुणांवर होणार, म्हणजे लिखित परीक्षा नाहीच! मग ज्यांनी मागील तीन वर्षांत GATE दिलंय आणि पास झालेत, त्यांच्यासाठी ही म्हणजे सोन्याची संधीच!
कुठल्या शाखांमध्ये जागा?
आर्किटेक्चर – 11
सिव्हिल – 199
इलेक्ट्रिकल – 208
इलेक्ट्रॉनिक्स – 527
IT – 31
वेतन: ₹40,000 ते ₹1,40,000 पर्यंत
वयोमर्यादा: 18 ते 27 वर्ष (आरक्षितांना सवलत आहे)
फी: सामान्य/OBC/EWS – ₹300, बाकी सर्व महिलांसह SC/ST/PwBD – फुकट
कसं करायचं अर्ज?
सगळ्यांनी www.aai.aero वर जाऊन जाहिरात नीट वाचावी, आणि पात्रता, नियम, अटी तपासून मग अर्ज भरावा.
ही नुसती भरती नाही, ही संधी आहे प्रतिष्ठित संस्था AAI मध्ये थेट करिअर सुरू करण्याची!

Comments are closed.