एअरपोर्टवर नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी 2025 साठी सीनियर असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट पदांची भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 11 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ही भरती नॉर्थ-ईस्टर्न रिजनमधील नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडर पदांसाठी आहे. एकूण 14 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांना महिन्याला ₹31,000 ते ₹1,10,000 पर्यंत आकर्षक पगार मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी AAI च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.aai.aero) जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा, ग्रॅज्युएशन तसेच काही पदांसाठी दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारही पात्र आहेत. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि काही पदांसाठी संगणक चाचणीद्वारे होणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

Comments are closed.