भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी ९९०० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना यासाठी लवकरच अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असिस्टंट लोको पायलट हे भारतीय रेल्वेतील एक अत्यंत महत्त्वाचे पद आहे. ALP ची भूमिका ट्रेनच्या सुरक्षेसाठी आणि गती नियंत्रणासाठी महत्त्वाची आहे, तसेच ट्रेनच्या सुरक्षित आणि वेळेवर वाहतुकीसाठी जबाबदार असतो.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे, किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन केल्यासही अर्ज करता येईल. तसेच उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे लागेल. उमेदवारांची निवड प्रक्रिया चार टप्प्यांत केली जाईल.
पहिला टप्पा म्हणजे CBT-1 (प्राथमिक संगणकीय चाचणी), दुसरा टप्पा CBT-2 (मुख्य संगणकीय चाचणी), त्यानंतर ALP पदासाठी CBTAT (कंप्युटर आधारित एप्रिट्यूड टेस्ट) आणि शेवटी कागदपत्र पडताळणी. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. उमेदवारांनी RRB (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून नोंदणी केली पाहिजे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
याशिवाय, अर्ज शुल्क देखील ऑनलाइन भरावे लागेल. सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹५००/- आहे, तर SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी ₹२५०/- आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट घेतली पाहिजे, ज्यामुळे भविष्यातील प्रक्रिया सुलभ होईल.