सशस्त्र पोलिस दलात ९३ हजार रिक्त जागा!-93,000 CAPF Vacancies!

93,000 CAPF Vacancies!

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याची माहिती गृह मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. एकूण ९३ हजार १३९ पदे सध्या रिक्त असून ही संख्या मंजूर पदांच्या सुमारे ८.५ टक्के इतकी आहे, असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी खासदार अशोक मित्तल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

93,000 CAPF Vacancies!उपलब्ध माहितीनुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये सर्वाधिक २८,३४२ पदे रिक्त आहेत, जे मंजूर पदांच्या सुमारे १७.७ टक्के आहेत.

त्यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) मध्ये २७,४०० पदे रिक्त असून हे दल देशातील सर्वात मोठे सशस्त्र राखीव पोलिस दल मानले जाते. अंतर्गत सुरक्षा राखणे आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी राज्य पोलिसांना मदत करण्याचे काम CRPF करते.

याशिवाय सीमा सुरक्षा दल (BSF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) या दलांमध्येही हजारो पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सादर करण्यात आली.

Comments are closed.