पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रशासनिक अडचणी निर्माण करणारी महत्त्वाची बाब समोर आली आहे. शहरातील एकूण ९१ शाळांमध्ये मुख्याध्यापक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे.
या रिक्त पदांमध्ये ८० मराठी माध्यम आणि ११ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ही माहिती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रश्नोत्तरातून समोर आली.
गेल्या काही वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेली होती. मात्र आता पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी ही पदे भरण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.