९० लाख महिला अपात्र!-90 Lakh Women Out!

90 Lakh Women Out!

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शासनाने केलेल्या पडताळणीनंतर तब्बल ९० लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या महिलांना दरमहा मिळणारी ₹१५०० ची आर्थिक मदत आता मिळणार नाही.

90 Lakh Women Out!सुरुवातीला या योजनेसाठी सुमारे २.६ कोटी महिलांनी अर्ज केले होते, मात्र तपासणीनंतर ही संख्या घटून १.५३ कोटींवर आली आहे. पडताळणी प्रक्रियेत अनेक अर्ज निकषांमध्ये बसत नसल्याचे स्पष्ट झाले.

योजनेतून नाव वगळण्यामागे काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असणे, घरात चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी अर्ज करणे किंवा सरकारी नोकरीत असणे या कारणांमुळे अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत.

तसेच, KYC पूर्ण न केलेल्या महिलांनाही लाभ मिळणार नाही. अंगणवाडी व स्थानिक पातळीवरील पडताळणीतून ही माहिती समोर आली असून, यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे.

Comments are closed.