सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट समोर येत असून, पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळण्याची शक्यता आहे. जरी पगारवाढीचा अंतिम आकडा जाहीर झाला नसला, तरी वाढ निश्चित मानली जात आहे.
सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपल्यानंतर, आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ पासूनचा एरियर मिळू शकतो. म्हणजेच १२ ते २४ महिन्यांचा थकबाकी फरक थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
बेसिक सॅलरी किती वाढू शकते?
फिटमेंट फॅक्टर २.० ते २.५७ दरम्यान ठरल्यास पगारात मोठी वाढ होईल.
- लेव्हल १: ₹३६,००० ते ₹४६,२६०
- लेव्हल २: ₹३९,८०० ते ₹५१,१४३
- लेव्हल ३: ₹४३,४०० ते ₹५५,७६९
- लेव्हल ४: ₹५१,००० ते ₹६५,५३५
एरियर किती मिळू शकतो?
जर २० महिन्यांचा एरियर धरला तर —
- लेव्हल १: सुमारे ₹३.६० लाख
- लेव्हल २: सुमारे ₹३.९८ लाख
- लेव्हल ३: ₹४.३४ ते ₹६.८१ लाख
- लेव्हल ४: सुमारे ₹५.१० लाख
मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी २०२७ मध्ये लागू होण्याची शक्यता असून, तोपर्यंतचा संपूर्ण फरक एरियर स्वरूपात कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

Comments are closed.