केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट देत 3 नोव्हेंबर 2025 रोजी आयोगाची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.
या आयोगाला पगार, भत्ते आणि पेन्शनसंबंधी शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
सध्या आयोग विविध विभाग, राज्य सरकारे, कर्मचारी व नागरिकांकडून अभिप्राय गोळा करत असून MyGov पोर्टलवर यासाठी प्रश्नही प्रकाशित करण्यात आले आहेत. अभिप्राय देण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
पगारवाढीबाबत मोठी बाब म्हणजे, जरी आयोगाचा अहवाल उशिरा आला तरी सुधारित पगार 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासोबतच थकबाकी (arrears) देखील मिळण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या वेतन आयोगात सुमारे 20% ते 35% पर्यंत पगारवाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3 दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय हा आर्थिक परिस्थिती आणि सरकारच्या धोरणांवर अवलंबून असेल.
प्रत्यक्षात वाढीव पगार 2026 च्या शेवटी किंवा 2026-27 या आर्थिक वर्षात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, पण एकूणच हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

Comments are closed.