नागपूर विभागातील अकरावी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या अंतिम फेरीनंतर ८६,०१६ जागा रिक्त राहिल्या आहेत. ही फेरी ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान राबवण्यात आली होती.
राज्यातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समिती (CAP) मार्फत केंद्रीय पद्धतीने केले जातात. मागील काही महिन्यांपासून विविध फेऱ्या पार पडल्या असून, त्यात कोटा आणि CAP फेऱ्या यांचा समावेश आहे.
नागपूर विभागात एकूण १,३११ कॉलेजेस असून, त्यामध्ये २,२१,२३५ जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंतच्या फेऱ्यांनंतर १,३५,२१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
जिल्हानिहाय रिक्त जागा:
भंडारा: ७,०२७
चंद्रपूर: १३,१८०
गडचिरोली: ५,५८६
गोंदिया: ८,४८९
नागपूर: ४२,१८४
वर्धा: ९,५५०
अजूनही या सहा जिल्ह्यांमध्ये ८६,०१६ जागा रिक्त आहेत. शाखानिहाय प्रवेश झालेले विद्यार्थी:
आर्ट्स: ४५,२३०
कॉमर्स: १६,१०६
सायन्स: ७३,८८३

Comments are closed.