जलसंधारण खात्याच्या भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली हांय! तब्बल ८६६७ रिक्त पदं भरायला उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळालेली असून लवकरच ही भरती सुरू होणार, अशी माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली.
२०१७ मध्ये विभागाची स्थापना झाली, पण पदं तशीच प्रलंबित. आधीचा आकृतीबंध पूर्ण न झाल्यानं नवीन आकृतीबंध तयार करून तो समितीकडे सादर केला गेला. त्यात जुनी, गरज नसलेली पदं काढून टाकून ८६६७ नव्या पदांचा समावेश करण्यात आला. आता या सर्व पदांना मान्यता मिळाल्यानं जलसंधारणाचं काम वेगात पार पाडता येणार.
संजय राठोड म्हणाले:
“या भरतीमुळे खात्याचं काम अधिक सुरळीत होईल, शेतकऱ्यांनाही सिंचनाच्या कामात फायदा होईल.”
त्यांनी हेही स्पष्ट केलं की काही योजना लोकांच्या विरोधामुळे, वनजमिनीच्या वादामुळे आणि प्रशासकीय अडचणीमुळे थांबवण्यात आल्या आहेत. पण पुढं गरज पडली तर त्या योजनांचं पुनरावलोकन होईलच.